पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचाच महापौर होणार ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास

380 0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं “संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी” या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात आगमन झाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुप्रिया सुळे,खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे वडगावशेरी, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली.

या अंतर्गत सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांचे विशेष कौतुक केले. “त्यांनी पुढाकार घेत नवे पक्ष कार्यालय सुरू केले , या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये वडगावशेरी व हडपसर या विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. त्याचा परिणाम म्हणून आमदार सुनील टिंगरे व चेतन तुपे यांना आपण विधानसभेत पाठवले खडकवासला व पर्वती या दोन विधानसभा मतदासंघांत आपण तयारीत कमी पडलो तिथे थोड्याफार फरकाने आपल्या सहकार्‍यांना अपयश आले. मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

ज्येष्ठ नेत्यांसोबत थेट संवाद होत असणल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिवार संवाद यात्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे , सर्व आजी-माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,कार्यकारणी सदस्य व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

पुण्यातील मनसेची महाआरती उद्या नाही, तर ४ तारखेला होणार ! काय आहे कारण ?

Posted by - May 2, 2022 0
पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे.…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Posted by - April 18, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी…

Devendra Fadnavis : “विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले…!”

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली…
ED

पिंपरी चिंचवड : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ED चे छापे ; 400 कोटींहून अधिकचा घोटाळा

Posted by - January 27, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने आज सकाळपासून छापे टाकले…

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ कडेच! भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *