रशियाने युक्रेनवर केलेल्या गोळीबारात मृत पावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा कोण आहे आणि तेव्हा काय घडलं?

403 0

युक्रेनच्या खारकीवमध्ये रशियाच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता.

काय घडलं ?

किराणा विकत घ्यायला नवीन बाहेर होता आणि त्याच वेळी तिकडे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला आणि त्यात नवीनच मृत्यू झाला.हा गोळीबार युक्रेनच्या सैन्याचा नव्हता तर हा गोळीबार हा रशियाच्या सैन्याचा होता.आता त्याचा मृतदेह शवागृहमध्ये आहे, लवकरात लवकर मृतदेह भारतात आणण्याची व्यवस्था करत आहेत.नवीनच्या मित्रांकडून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

ही माहिती नवीनच्या भावाने परराष्ट्र मंत्रालयाला फोन केल्यानंतर देण्यात आली आहे.अजूनही अनेक विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी नवीनच्या मृत्यूनंतर मोठ्या दहशतीच्या वातावरणात आहेत.परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी नवीन शेखरप्पाच्या घरी फोन केला आणि त्याच्या वडिलांशी फोन बोलले. पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. दुसरीकडे खारकीव्हमधील परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे समोर आले आहे. तिथे अडकेल्या भारतीयांची सुरक्षा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रधान्याने सरकार काम करत आहे, असे केंद्र सरकारमधील सुत्रांनी सांगितले.

Share This News

Related Post

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत (व्हिडीओ)

Posted by - January 31, 2022 0
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर…

UPDATES : ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु !

Posted by - January 20, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगासमोर आज चार वाजता ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? या महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होते आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी…

Decision of Cabinet meeting : भातसा, वाघूर प्रकल्पांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : भातसा तसेच वाघूर प्रकल्पांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

भयानक : गर्भवती पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत व्हायचे होते विभक्त; पत्नीला दिले HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन; आणि मग…

Posted by - December 19, 2022 0
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील या भयावह घटनेने देश हादरला आहे. पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत विभक्त होण्याच्या उद्देशाने पतीने क्रूरतेचा कळस…
Nashik News

Nashik News : ‘मी जीव देण्याचं कारण फक्त…’ नाशिकमध्ये 10 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Posted by - August 23, 2023 0
नाशिक : नाशिकच्या (Nashik News) सिन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) तीन तरुणांच्या टवाळखोरीला वैतागून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *