राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटानं पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

150 0

महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.

पक्षाचे मजबूत संघटन व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या पाहता शरद पवार व प्रदेशाध्यक्ष  पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध आहेत.

दिनांक २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

या अर्जाबरोबर खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना दहा हजार रुपये तर इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना 5000 रुपये द्यावे लागणार आहेत हे शुल्क केवळ डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरूपात स्वीकारले जाईल.

“नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” या नावे डिमांड ड्राफ्ट देण्यात यावा असा आवाहन देखील पक्षाच्या वतीने करण्यात आलय

 

 

Share This News

Related Post

ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा पुढाकार

Posted by - May 1, 2023 0
पुणे : ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी आता ‘पुनीत बालन ग्रुप’ने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑलम्पिक…
RSS

मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र व्हायरल केल्याने कर्नाटकात RSS कार्यकर्त्याला अटक

Posted by - June 2, 2023 0
बंगळुरू : सध्या कर्नाटकातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र (Cartoon) समाज…
Solapur News

Sharad Pawar : ‘साहेब आम्हाला न्याय द्या’ शाळेच्या रस्त्यासाठी चिमुकल्यांनी शरद पवारांना दिले निवेदन

Posted by - November 17, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेला जाण्यासाठी रस्ता करून मिळावा या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे…

काळ आला होता, पण…. शाळेची बस इंद्रायणी नदीत कोसळता कोसळता बचावली

Posted by - July 5, 2024 0
पिंपरी-चिंचवड शहरातील चरहोली येथे काल दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान स्कूलबस चालकाचं बस वरील नियंत्रण सुटल्याने बस इंद्रायणी नदीच्या पुलावरील कठड्याला…
Thar

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

Posted by - June 13, 2023 0
आजकाल शेतीदेखील आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पुण्यातील इंदापूरात एका शेतकर्‍याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *