महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन? तब्बल ‘एवढ्या’ जणांनी मागितली विधानसभेची उमेदवारी

216 0

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली असून आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडे 1400 जणांनी उमेदवारी मागितली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात दणदणीत यश मिळवत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचाही काँग्रेस पक्षावर विश्वास वाढल्याचं दिसून येतेय. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे 1400 जणांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे.

नुकतच या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी एक विधान केलं होतं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी साठी इच्छुकांची अर्ज येत असून आम्ही मेरिट नुसारच उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी सांगितलं होतं.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या खडतर प्रवासातून जावं लागलं होतं. 2014 मध्ये काँग्रेस पक्षाला 42 ते 2019 मध्ये 44 जागा जिंकता आल्या. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष नेमकी कशी कामगिरी करतो हे महत्वाचं ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!