सोमवती यात्रेच्या निमित्तानं वाहतुकीत बदल; कशी असणार पर्यायी वाहतूक व्यवस्था

86 0

पुणे, दि. २८: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री २४.०० वाजेपर्यंत पुणे जेजुरी-बारामती महामार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणे अशी वळविण्यात येत आहे. जेजुरी बेलसर फाटा मार्गावर पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण व साताराकडे जातील.

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस ठाण्याअंतर्गत पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध २ सप्टेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

Posted by - February 2, 2023 0
पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने…
Pune News

Parvati : “पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार : चंद्रकांत पाटील

Posted by - November 17, 2023 0
पुणे : “पर्वती” (Parvati) टेकडीला मोठा ऐतिहासिक वारसा असून ही टेकडी पुण्याचे वैभव आहे, ते टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन…

Saswad Municipality : सासवड नगरपालिका हद्दीमध्ये कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करावी – डॉ उदयकुमार जगताप

Posted by - September 18, 2023 0
पुणे : सासवड हद्दी मध्ये (Saswad Municipality) भोंगळे पेट्रोल पंप जवळ,धन्वंतरी हॉस्पिटल जवळ नागरिक कचरा टाकून शहर विद्रूप व अस्वच्छ…

शहरात हलक्या पावसाच्या सरी

Posted by - March 10, 2022 0
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पुढील तीन…

प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून प्रियकराने पळवला तिचा दीड वर्षाचा मुलगा, आरोपीला अटक

Posted by - May 5, 2022 0
पुणे- भांडणाच्या रागातून प्रियकराने प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. सहकार नगर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला शिताफीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *