राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटानं पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

303 0

महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.

पक्षाचे मजबूत संघटन व प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या पाहता शरद पवार व प्रदेशाध्यक्ष  पाटील यांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध आहेत.

दिनांक २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

या अर्जाबरोबर खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना दहा हजार रुपये तर इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना 5000 रुपये द्यावे लागणार आहेत हे शुल्क केवळ डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरूपात स्वीकारले जाईल.

“नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” या नावे डिमांड ड्राफ्ट देण्यात यावा असा आवाहन देखील पक्षाच्या वतीने करण्यात आलय

 

 

Share This News
error: Content is protected !!