पुणे : सगळीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आज पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल कारण्यापूर्वी ते पदयात्रा काढणार आहेत. यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते किती वाजता अर्ज दाखल करणार? त्यांचा उमेदरवारी अर्ज दाखल करताना कोण हजेरी लावणार? त्यांच्या पदयात्रेचा मार्ग कसा असणार? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….
मुरलीधर मोहोळ यांचा दिनक्रम?
सकाळी 8 वा : कुटुंबियांकडून औक्षण, कोथरुड निवासस्थान
सकाळी 8.30 वा : ग्रामदैवत श्री कसबा गणपती दर्शन
सकाळी 8.45 वा : ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी दर्शन
सकाळी 9 वा : श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरुड येथे आगमन
सकाळी 9.30 वा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, रामदासजी आठवले, चंद्रशेखरजी बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक, कोथरूड, पुणे येथून पदयात्रेला सुरूवात
सकाळी 10.30 : छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन (स्थळ : छत्रपती श्री. संभाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना, पुणे)
सकाळी 10.45 : पदयात्रेचा समारोप (स्थळ : खंडोजीबाबा चौक, डेक्कन जिमखाना, पुणे)
सकाळी 11.30 : श्री. मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार
अर्ज दाखल करताना कोण कोण राहणार उपस्थित?
मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र,श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजपा, महाराष्ट्र,श्री. रामदास आठवले, केंद्रीय मंत्री,श्री.चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पुण्यात होणार चौरंगी लढत
पुण्यात यंदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना तर माविआकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच एमआयएमकडून अनिस सुंडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.