पुणे : लोकसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. आज राज्यात तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. चौथ्या टप्प्यामध्ये पुणे लोकसभा (Pune News) मतदासंघाचा समावेश आहे. यादरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मतदान केलं नाही तरी देखील मतदान झाल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच आज मतदान सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचा देखील चौथ्या टप्प्यामध्ये समावेश आहे. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे आपला मतदानाचा हक्का बजावण्यासाठी निवडणूक केंद्रावर गेले होते. मात्र त्यांनी मतदान न करताही त्यांच्या नावाने दुसरंच कोणीतरी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!
Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन
Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी
Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन
Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला