बांधकाम व्यावसायिक गणेश भिंताडे यांचे निधन

999 0

पुणे- बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे कार्यकर्ते गणेश भिंताडे (वय ४४) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज पहाटे २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी धनकवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश भिंताडे यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यातून ते बरे झाले होते. पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे २ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

गणेश भिंताडे हे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांनी भाजपच्या तिकिटावर पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.

 

Share This News
error: Content is protected !!