पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहेत. शनिवारी देखील असाच एक भीषण अपघात झाला हुशार आईचा जागेवरच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. डंपरची दुचाकीला धडक बसल्याने हा जबर अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि १०) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वाघोली- आव्हाळवाडी रोडवरील बाजारतळ मैदानाजवळ घडली.
अलका जुनगडे (वय ६६, रा वाघोली ) या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा पियुग जुनगडे ( वय ३६, रा वाघोली ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका जुनगडे आणि त्यांचा मुलगा पियुष जुनगडे हे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरघाव डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये आईचा मृत्यू झाला. तर मुलगाही गंभीर जखमी आहे. या अपघात प्रकरणी डंपर चालक राहुल शिवाजी लोखंडे ( वय ४०, रा. खांदवेनगर, वाघोली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे पुन्हा एकदा शहराच्या वरदळीच्या रस्त्यांवर होणाऱ्या जड वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जड वाहनांना शहरात दिवसा वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळी मित्र वाहनांची संख्या कमी असल्यामुळे अनेकदा अवजड वाहनांचे चालक भरधाव वेगात वाहने चालवतात. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत असल्याने जड वाहनांवर शहरात पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.