पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीओ (DRDO) दिघे येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या संचालक पदी डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. DRDO चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याजागी डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती केली आहे.
कोण आहेत डॉ. मकरंद जोशी ?
डॉ. जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट 2000 मध्ये आर अँड डीई (अभियंता) या प्रयोगशाळेत रुजू झाले होते. आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.