पुणे : पुणे (Pune) पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी ते पोलीस दलातून निवृत्त झाले होते. प्रकाश अनंता यादव (Prakash Ananta Yadav) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रकाश यादव हे बुधवारी (दि.31 मे) पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. बुधवारी त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील (IPS Sandeep Singh Gill) यांच्याहस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता. सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा मृत्यू झाल्याने पुणे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकाश यादव हे पुणे पोलीस मुख्यालयात सी कंपनीत कार्यरत होते. ते पोलीस जीम ट्रेनर होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यासंह पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकाश यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.