उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

366 0

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. त्यातील एक भाग म्हणून वानवडी येथील शंभर बेडच्या “वानवडी जनरल हॉस्पिटलचा” लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. १०० बेडची क्षमता असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये अद्यावत सोयी-सुविधांसह नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहेत.” 

या हॉस्पिटलच्या माध्यमातून वानवडी ,हडपसर तसेच पुणे शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक उत्तम सुविधा मिळतील”, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १. येथील बॅडमिंटन कोर्टच्या इंनडोर स्टेडियमचा शुभारंभ देखील पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रशांत जगताप व सौ रत्नप्रभा जगताप हे सातत्याने २००७ पासून एस.आर.पी.एफ मधील पायाभूत सुविधांवर काम करत असून राज्यभर आपत्कालीन परिस्थिती सण-उत्सव अशा सर्व परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांची काळजी घेतात याचा मला निश्चित अभिमान आहे, एस. आर.पी.एफ साठी इथून पुढच्या काळात देखील कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही”, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आमदार चेतन तुपे, अंकुश काकडे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नंदा लोणकर,अश्विनी कदम,नगरसेवक आनंद अलकुंटे ,मोहसिन शेख आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी, किरीट सोमय्या यांच्यानंतर नील सोमय्या यांना हायकोर्टाचा दिलासा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई- किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी कथित घोटाळाप्रकरणी तूर्तास…
Pune News

Pune News : …तो शो ठरला अखेरचा ! थिएटरमधून बाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Pune News) पूर्ववैमनस्याच्या वादातून 8 ते 10 जणांच्या…

CORONA UPDATES : भारतातील कोरोनाची आताची परिस्थिती; देशात कोरोनाचे 3397 सक्रिय रुग्ण, ‘या’ राज्यांमध्ये मास्क सक्ती

Posted by - December 24, 2022 0
जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. जपान, ब्राझील या देशांमध्ये कोरोनान अक्षरशः तांडव सुरू केला आहे.…

BIG NEWS : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

Posted by - October 10, 2022 0
पिंपरी चिंचवड : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसा भांडवल नसल्या कारणाने, द…
Govardhan Sharma

Govardhan Sharma : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

Posted by - November 4, 2023 0
अकोला : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचे काल रात्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *