सीसीटीव्हीमधून सासऱ्याची विधवा सुनेवर नजर, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा

793 0

विधवा सुनेवर नजर ठेवण्यासाठी सासऱ्याने हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय. सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास नकार दिल्यामुळे पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात ९२ वर्षीय सासरा आणि दिराच्या विरोधात तक्रार दाखल केलीये.

पीडित महिलेच्या पतीचे 2006 साली निधन झाले. त्यानंतर, दोन मुलींचा विवाह करून दिल्यानंतर पीडित महिला सासरी तिच्या 29 वर्षीय मुलीबरोबर पहिल्या मजल्यावर राहात होती. सुनेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सासरा आणि दिराने पहिल्या मजल्याच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. दरम्यान, पीडित महिलेचा जावई घरी भेटायला येत असे. त्यावरून सासरे आणि दीर अश्लील बोलायचे असा आरोप पीडित महिलेने केलाय.

पीडित महिला आणि तिच्या मुलीला घरातून निघून जाण्यास देखील सांगण्यात आल्याचं आणि पीडित महिलेच्या चार वर्षीय नातवाला मारहाण केल्याच तक्रारीत म्हटलंय.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सासरा आणि दिराच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी कविता रुपनर करत आहेत.

Share This News

Related Post

राज्य सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे पुणे महानगरपलिकेचे सुमारे दीड कोटी पाण्यात

Posted by - August 7, 2022 0
पुणे: महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावर्षी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला…

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Posted by - May 15, 2022 0
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. क्विन्सलॅण्डमधील…

राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपात भाकरी फिरली! प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Posted by - May 3, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सूचक विधान करत नुकताच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून…

कोल्हापूर पोटनिवडणुकीत पैसे वाटप होत असल्याबाबत आरोप-प्रत्यारोप

Posted by - April 12, 2022 0
कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. याठिकाणी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं भाजपवर…
Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *