सीसीटीव्हीमधून सासऱ्याची विधवा सुनेवर नजर, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा

966 0

विधवा सुनेवर नजर ठेवण्यासाठी सासऱ्याने हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय. सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास नकार दिल्यामुळे पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात ९२ वर्षीय सासरा आणि दिराच्या विरोधात तक्रार दाखल केलीये.

पीडित महिलेच्या पतीचे 2006 साली निधन झाले. त्यानंतर, दोन मुलींचा विवाह करून दिल्यानंतर पीडित महिला सासरी तिच्या 29 वर्षीय मुलीबरोबर पहिल्या मजल्यावर राहात होती. सुनेच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सासरा आणि दिराने पहिल्या मजल्याच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. दरम्यान, पीडित महिलेचा जावई घरी भेटायला येत असे. त्यावरून सासरे आणि दीर अश्लील बोलायचे असा आरोप पीडित महिलेने केलाय.

पीडित महिला आणि तिच्या मुलीला घरातून निघून जाण्यास देखील सांगण्यात आल्याचं आणि पीडित महिलेच्या चार वर्षीय नातवाला मारहाण केल्याच तक्रारीत म्हटलंय.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सासरा आणि दिराच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी कविता रुपनर करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!