पिंपरीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन टेम्पोचालकाकडून अत्याचार(व्हिडिओ)

794 0

पिंपरी- एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर टँपो चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. संबंधित टेम्पो चालकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

युवराज साळुंखे असे आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील मिलन लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी २४ मार्च रोजी युवराज साळुंखे याने पीडित अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो असं सांगितल. मात्र, प्रत्यक्षात हॉटेलमध्ये न जाता युवराजने तिला मिलन लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबद्दल कुणाकडे काही बोलल्यास, मी तुला बघुन घेईन….! अशी धमकी देखील त्याने पीडित मुलीला दिली.

Share This News
error: Content is protected !!