गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? अंकुश काकडे यांचा सवाल

744 0

पुणे- पुणे महापालिकेमध्ये मागील पाच वर्षापासून भाजपची निर्विवाद सत्ता आहे. भाजपची सत्ता असल्यापासून पुण्यात अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे हे वस्तुस्थिती आहे. असे असताना भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? असा सवाल राष्ट्रवादीचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे.

अंकुश काकडे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे.

काल त्यांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्तांवर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गिरीश बापट यांचा वर केली आहे.

गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

२६ मार्च रोजी पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला होता. प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बापट यांनी दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली या मध्ये संपूर्ण शहराला सामन पाणीपुरवठा सध्या पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे लोकांचे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का ? काही अधिकारी पाणी सोडणाऱ्यांवर दबाव आणून पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात सोडत आहे. हे दबावतंत्र नक्की टॅंकर लॉबीसाठी, की अन्य कोणासाठी ? असा प्रश्न खासदार बापट यांनी विचारला. पुढील तीन दिवसांमध्ये पाणीप्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे बापट यांनी सांगितले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!