विवाहित प्रेयसीने दिला दगा, प्रियकराने संपवले जीवन

594 0

पिंपरी- विवाहित प्रेयसीने लग्नाच्या आणाभाका देऊन ऐनवेळी आपल्या विवाहित प्रियकराला नकार देऊन त्रास दिला. या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंजवडीतील भूमकर वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी वाकड परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहीत महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, प्रियकर आणि प्रेयसी दोघेही विवाहित असताना या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. आरोपी प्रेयसीने प्रियकराला अनेक आश्वासने दिली. प्रेयसीने सांगितल्याप्रमाणे त्याने घटस्फोटासाठी दावाही दाखल केला. लग्नाच्या जोडीदारासोबत घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचे दोघांनी निश्चित केले. त्यानुसार प्रियकराने घटस्फोटासाठी दावाही दाखल केला. मात्र, प्रेयसीने तिच्या पतीपासून घटस्फोट न घेता प्रियकराला त्रास देण्यास सुरुवात केली.

या त्रासाला कंटाळून प्रियकराने आपल्या राहत्या घरात बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी सुसाईड नोटही त्याने लिहून ठेवली. दरम्यान त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!