भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा, १० हजारांचा दंड

593 0

अमरावती – राज्याचे माजी मंत्री भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वरुडच्या तहसीलदारांना 30 मे 2016 रोजी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आज न्यायालयाने ही शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.

संजय गांधी निराधार योजनेत एकूण 240 प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरूडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी डॉ. अनिल बोंडे हे कार्यकर्त्यांसह दुपारी तहसील कार्यालय धडकले होते. यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करीत तुला जिवंत राहायचे नाही का, तू माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही. अशा शब्दात तहसीलदार नंदकिशोर काळे यांना धमकावले होते.

तसेच कार्यालयातील शासन निर्णयाच्या प्रती आणि शासकीय फाईल पाडून टाकल्या होत्या. या प्रकाराबाबत नंदकिशोर काळे यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावर 11 मे 2017 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉक्टर अनिल बोंडे यांना कलम 332 अंतर्गत दोषी ठरविले. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिने कारावासाच्या शिक्षेसह दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!