विवाहित प्रेयसीने दिला दगा, प्रियकराने संपवले जीवन

536 0

पिंपरी- विवाहित प्रेयसीने लग्नाच्या आणाभाका देऊन ऐनवेळी आपल्या विवाहित प्रियकराला नकार देऊन त्रास दिला. या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंजवडीतील भूमकर वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी वाकड परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहीत महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, प्रियकर आणि प्रेयसी दोघेही विवाहित असताना या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. आरोपी प्रेयसीने प्रियकराला अनेक आश्वासने दिली. प्रेयसीने सांगितल्याप्रमाणे त्याने घटस्फोटासाठी दावाही दाखल केला. लग्नाच्या जोडीदारासोबत घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचे दोघांनी निश्चित केले. त्यानुसार प्रियकराने घटस्फोटासाठी दावाही दाखल केला. मात्र, प्रेयसीने तिच्या पतीपासून घटस्फोट न घेता प्रियकराला त्रास देण्यास सुरुवात केली.

या त्रासाला कंटाळून प्रियकराने आपल्या राहत्या घरात बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी सुसाईड नोटही त्याने लिहून ठेवली. दरम्यान त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Share This News

Related Post

Pune News : यावर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार

Posted by - September 6, 2023 0
पुणे : श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात…
Pune Death

पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले; Video आला समोर

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीस्वाराने एका महिलेला उडवले. ही…

#PUNE ACCIDENT : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात माय लेकरासह एका तरुणाचा मृत्यू

Posted by - February 4, 2023 0
शिक्रापूर : बेल्हा जेजुरी महामार्गावर दुचाकीवरून जात असताना माय लेकराचा आणि आणखीन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्रापूरच्या दिशेने…

हर्षोल्हासात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन ; पहा VIDEO

Posted by - September 9, 2022 0
पुणे : धर्मशास्त्रानुसार भक्तिभावाने आज गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकरांचा दांडगा उत्साह पाहायला मिळतो आहे . २ वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते…
Vasai News

Vasai News : तोल गेल्याने वाहत्या नाल्यात पडून व्यक्तीचा मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
पालघर : वसईमध्ये (Vasai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. बिस्कीट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा वाहत्या नाल्यात बुडून दुर्दैवी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *