ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया… काय म्हणाले राऊत ?

569 0

मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. या कारवाई नंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत पुढे म्हणाले, ” आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. याबाबत कधी कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही. माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू”

“राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते”

Share This News

Related Post

नितीन गडकरींपाठोपाठ आता रावसाहेब दानवे शिवतीर्थावर ; राज ठाकरेंची घेतली भेट

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच मी भेट घेणार आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत काही दिवसांपुर्वी…
Parbhani News

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Posted by - December 17, 2023 0
परभणी : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून समोर आली आहे.…

Euthanasia : इच्छामरणाच्या तत्त्वात होणार बदल ! भारतात कशी आहे प्रक्रिया ?

Posted by - January 19, 2023 0
दुर्धर आजाराने ग्रस्त आणि बर होण्याची शक्यता नसलेल्या रुग्णांना आगाऊ वैद्यकीय सूचना किंवा इच्छापत्र लिहून इच्छामरण पत्करण्यासंदर्भात 2018 मध्ये दिलेल्या…

शिक्षकच होता हैवान; आई वडील एकमेकांच्या भांडणात होते व्यस्त; असा आला गुन्हा उघडकीस, पण तोपर्यंत…

Posted by - March 4, 2023 0
पुणे : पुण्यामधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्थात ही घटना उघडकीस येईपर्यंत या पिडीतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *