Breaking News

पंतप्रधान मोदी माफी मागा ; पुण्यात काँग्रेसचं आंदोलन (व्हिडिओ)

583 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानाजवळ “माफी मागो” आंदोलन करण्यात आले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसकडून करण्यात आला. या आंदोलनात पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोहन जोशी, संजय बालगुडे, काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे”

Share This News
error: Content is protected !!