एस एस प्रोफेशनल इन्स्टिट्यूट वर्षभरापासून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे संपूर्ण शुल्क घेऊन सुद्धा दुसऱ्या सत्राची परीक्षा वेळेवर झाली नाही त्याचप्रमाणे संपूर्ण शुल्क घेऊन ही विद्यार्थ्यांचे दैनंदिन होणारे लेक्चर होत नाहीत, अशा सर्व विषयांना घेऊन अभाविप मध्यपुणे भागाच्या वतीने इन्स्टिट्यूट मधील प्रचार्यांच्या दालनाला कुलूप लावून टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रचार्यांकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे नसल्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला.त्यानंतर सर्व विद्यार्थी पुणे विद्यापीठात परीक्षा विभाग संचालक महेश काकडे यांच्याकडे गेले असता संबंधित महाविद्यालयाचा आणि विद्यापीठाचा परिक्षेसंबंधित कुठलाही पत्रव्यवहार झाला नाही असे सांगितले, यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभाविप कार्यकर्ते परीक्षा विभागाच्या बाहेर आंदोलनास बसले व पुणे विद्यापीठ परीक्षा संचालक महेश काकडे यांनी अभाविपची मागणी मान्य करून. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली.
यावेळी पुणे शहरातील विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना अभाविप धडा शिकवेल असे मत अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी मांडले व
S S Professional इन्स्टिट्यूट आम्ही बंद पाडू असा आक्रमक पवित्रा अभाविप मध्यपुणे भाग संयोजक क्षुधांत पाटील यांनी घेतला.
याठिकाणी अमोल देशपांडे,तन्मय ओझा,मंदार लडकत, शंतनू ढमढेरे,सई थोपटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते