शिवसेना खासदार संजयजी राऊत यांनी महापौर मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर अग्रलेखातून ‘पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत’. असा उल्लेख केला होता, त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर जोरदार उत्तर दिले आहे.
डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवंल की असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात. जम्बोचं प्रकरण अंगलट येतंय, याची जाणीव झाल्यावर हे असं दुसऱ्यावर शिंतोडे उडवणे सुरु आहे. राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी आहे.
पुण्यातील जम्बो रुग्णालयाची उभारणीची चर्चा झाली, तेव्हाच मुंबईतील ठगांकडून यासाठीचे कंत्राटे मिळवण्यासाठीची दादागिरी सुरू केली होती. महापालिका प्रशासनाने आगामी काळातील या ठगांचे संभाव्य धोके ओळखले आणि प्रशासनाने हे रुग्णालय उभारण्याची जबाबदारी पीएमआरडीएवर दिली.
सर्वज्ञानी @rautsanjay61 जी, उत्तर द्याल का?
डोक्यावर परिणाम झाला आणि वास्तवाचं भान हरवलं की असे टेबल न्यूजसारखे आरोप केले जातात. जम्बोचं प्रकरण अंगलट येतंय, याची जाणीव झाल्यावर हे असं दुसऱ्यावर शिंतोडे उडवणे सुरु आहे. खा. राऊतांची अवस्था भरकटून बुडायला लागलेल्या जहाजासारखी आहे. pic.twitter.com/9OfdOH9UnQ
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 27, 2022
पीएमआरडीए हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येते. खासदार राऊत साहेब तुमच्या दारात नित्यनियमाने बसणाऱ्या त्या व्यक्तिंनी अटीशर्ती मॅनेज करून हे कंत्राट मिळवले आणि त्यांनी पुणेकरांचेच जीव घेतले. त्यानंतर पुणेकरांनी या तुमच्या बहाद्दरांना ब्लॅकलिस्ट करून पुण्यातून हाकलले आहे.

पुणेकरांच्या जीवाशी खेळला गेलेला हा काळा धंदा कोणाच्या आशीर्वादाने झाला होता, याचा खुलासा केला तर बरं होईल. असं देखील मोहोळ म्हणाले.
पुणेकरांच्या जीवाशी खेळला गेलेला हा काळा धंदा कोणाच्या आशीर्वादाने झाला होता, याचा खुलासा केला तर बरं होईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 27, 2022