विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या – अजित पवार

98 0

पुणे- विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, शिक्षण समिती सदस्या अरूणा थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “नव्या युगाच्या आवाहनांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे. कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. पालकांचाही यामध्ये सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहेत. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवायला हवे”

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या, “कोरोना कालावधातीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे अत्यंत चांगले कार्य केले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरू राहीले” ग्रामीण भागातील अनेक शाळा आदर्श करण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवतारे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Sanjay Kakde

Sanjay Kakde : माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ! कर्ज बुडविल्याप्रकरणी कोर्टाकडून कंपनीचे शेअर्स विकण्याचे आदेश

Posted by - June 29, 2023 0
पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज…
Nagaraj Manjule

Nagaraj Manjule : नागराज मंजुळेंची मोठी घोषणा ! नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले समोर

Posted by - July 21, 2023 0
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांची मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यांनी कायमच सशक्त कलाकृतींतून सिनेसृष्टीत…

शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू, पुण्यात लोणी काळभोर मधील घटना

Posted by - March 2, 2022 0
पुणे- शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. या घटनेत चारही तरुणांचा मृत्यू झाला चौघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिस आणि…

मोठी बातमी : भेकराईनगर परिसरातील नागरिकांचे चौकात रास्ता रोको आंदोलन; दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक संतप्त; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Posted by - December 19, 2022 0
पुणे : अनेक दिवसांपासून भेकराईनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याच्याच निषेधार्थ आज संतप्त स्थानिक नागरिकांनी भेकराईनगर येथे पुणे सासवड…

माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचं निधन

Posted by - March 6, 2022 0
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यातील विश्वासू सहकारी आणि पुण्यातील शिवसेना वाढीसाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. नंदू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *