पुणे जिल्हा परिषदेवर 21 मार्च पासून प्रशासक येण्याची शक्यता ?

126 0

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल येत्या २१ मार्च रोजी संपत आहे.

अद्याप गट आणि गणांची प्रारूप रचना अंतिम न झाल्याने तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यासह राज्यातील २६ जिल्हा परिषदांचा कार्यकाल संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची प्रारूप रचना अद्याप तयार झालेली नाही.

त्यात नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, तारखा ठरवणे, प्रारूप रचना ठरवणे याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला राज्य शासनाला विचारून घ्यावा लागणार आहे.

यामुळे गट व आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत गणांच्या पुनर्रचनेवर परिणाम होणार आहे.

या बाबींमुळे यंदा निवडणुका पडणार असल्याचे स्पष्ट संकेत असून, स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेची आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

  • जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्चला संपणार आहे. तर तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाल १३ मार्चला संपत आहे 
  • मात्र अद्याप गट, गण रचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे २१ तारखेपासून जिल्हा परिषदेवर तर १४ मार्चपासून पंचायत समित्यांवर प्रशासन नेमला जाण्याची शक्यता आहे.

निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचे अधिकार आता राज्य शासनाकडे आहेत.
या नव्या आदेशामुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना पुन्हा होण्याची शक्यता आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची प्रारुप रचनाही बदलण्याची शक्यता आहे. यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने निवडणुका लांबणीवर जाणार आहेत. यामुळे प्रशासकाच्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे. किमान ३ ते ४ महिने प्रशासक राहण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

मावळमध्ये थरार : चोरीच्या उद्देशाने उचकटले कपाट; आवाजाने जाग आली आणि मालकिणीचे रौद्ररूप पाहून चोरट्यांनी ठोकली धूम, पहा व्हिडिओ

Posted by - October 27, 2022 0
(मावळ) पुणे : मावळमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने नागरिक या महिलेच्या धाडसाचं कौतुक करत आहे. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश…
Supriya Sule

Supriya Sule : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Posted by - December 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या…

#VIRAL PHOTO : हुमा कुरेशीने केले बोल्ड फोटोशूट, चाहते म्हणाले, “शिखर धवनचा यामुळेच फॉर्म गेला…!”

Posted by - February 25, 2023 0
चित्रपट अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे 5 फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ऑरेंज आणि ब्लॅक डीप नेक वन…

उद्धव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा, ठाकरे गटाकडून सभेची जोरदार तयारी

Posted by - March 2, 2023 0
नाशिक : शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई, ठाणे वगळता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *