बैलगाडा शर्यतीहून परतताना पिकअप गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू , चार जण जखमी

435 0

आंबेगाव- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

आकाश लोणकर असे मृत तरूणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर गावचा रहिवासी आहे तर जखमी तरुण पिंपरखेड चोंभुत शिरपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील नाणोली येथे गेले होते. शर्यतीहून परत येताना प्रवास करत असलेल्या पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यावेळी पिकअप गाडीमधून एकूण 16 ते 17 तरुण प्रवास करत होते. सध्या जखमींवर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Gadchiroli Crime

Gadchiroli Crime : रात्री झोपेतच झाली तरुणीची हत्या; 80 संशयितांची चौकशी केल्यानंतर सापडला खरा खुनी

Posted by - August 4, 2023 0
गडचिरोली : काही दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीची रात्री झोपेत कुणीतरी हत्या केली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यत एकच (Gadchiroli Crime)…

आत्महत्या करणाऱ्या वकीलाचे पोलिसानं वाचवले प्राण; जिवाची पर्वा न करता पाण्यात मारली उडी…

Posted by - July 9, 2022 0
पुणे: पुण्यातील बागुल उद्याना शेजारी असलेल्या ओढ्यात एक व्यक्ती वाहून जात असताना दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सद्दाम शेख यांनी…

हृदय पिळवटून टाकणारी घटना : लग्नाची हळद सुटली ना मेहेंदी; लग्नाच्या पाचच दिवसात नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 24, 2022 0
बारामती : आयुष्यातील संस्मरणीय प्रसंग असतो तो म्हणजे लग्न…! दोन अगदी वेगळ्या वातावरणात लहानाचे मोठे झालेले दोघेजण पुढचे संपूर्ण आयुष्य…

एका होता चांदणी चौक पूल : ब्लास्ट केला पण पूर्ण पूल पडलाच नाही ? अधिकारी म्हणतात आमच्या अंदाजापेक्षा…

Posted by - October 2, 2022 0
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः त्रासला होता. गणेशोत्सव काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले असताना ते…

जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी

Posted by - June 7, 2022 0
जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *