बैलगाडा शर्यतीहून परतताना पिकअप गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू , चार जण जखमी

618 0

आंबेगाव- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

आकाश लोणकर असे मृत तरूणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर गावचा रहिवासी आहे तर जखमी तरुण पिंपरखेड चोंभुत शिरपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मावळ तालुक्यातील नाणोली येथे गेले होते. शर्यतीहून परत येताना प्रवास करत असलेल्या पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यावेळी पिकअप गाडीमधून एकूण 16 ते 17 तरुण प्रवास करत होते. सध्या जखमींवर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!