पुण्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या; शहरभरात एकच खळबळ, धक्कादायक कारण आलं समोर 

257 0

पुण्यात हत्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. काल रात्री पुण्यात पुन्हा एक हत्या झाली. हडपसर गुलटेकडी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सुनील सरोद हा डायस प्लाट परिसरात राहतो. त्याची हत्या सराई त गुन्हेगारांनी केली. मोक्का कारवाईतून जामिनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे या दोघा भावांनी त्याची हत्या केली. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हत्येचं कारण 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुनील आणि आरोपी कांबळे हे तिघेही एकमेकांचे मित्र आहेत. 7 जुलै रोजी आरोपी रोहनचा वाढदिवस होता. त्यावेळी आपापसातील वादामुळे मयत सुनीलने त्याला मारहाण केली होती. याचा राग रोहनच्या मनात होता. याच रागातून मंगळवारी रात्री रोहन आणि त्याचा भाऊ शिवशरण कांबळे सुनीलच्या घरी गेले. त्यांनी सुनीलचा भाऊ गणेश याला मारहाण सुरू केली. त्यावेळी सुनीलमध्ये आला. त्याचवेळी आरोपीने कोयत्याने त्याच्या गळ्यावर वार केला. याच वारामुळे जखमी झालेल्या सुनीलचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!