राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या गोळीबार प्रकरणी आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे पोलिसांकडून आणखी 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रविवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ गोळीवार करण्यात आला होता. गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार देखील करण्यात आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात न्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या अवघ्या बारा तासाच्या आतच पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. वनराज आंदेकर यांच्या सख्ख्या बहिणी संजीवनी कोमकर, कल्याणी कोमकर, दाजी गणेश कोमकर, जयंत कोमकर, गुंड सोमनाथ गायकवाड यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बहिण संजीवनीच्या सांगण्यावरून कौटुंबिक वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याच प्रकरणात आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणाच्या तामिनी घाट परिसरातील पोलिसांनी 13 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.