मुंबई: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाचण्यास सुरुवात झाले आहे सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र पाच ते सहा महिन्यापासून खडसे यांना भाजपाकडून वेटिंगवर ठेवण्यात आल्यानं आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहे याच विषयावर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या वृत्तवाहिनीवर बोलत असतानाच देवेंद्र फडणवीस की गिरीश महाजन या भाजपामधील नेत्यांपैकी एकनाथ खडसे याचा सर्वाधिक राग कोणत्या नेत्यांवर आहे असा प्रश्न विचारला असता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना राजकारणात मी मोठा केला असं म्हणत माझा स्पष्टपणे देवेंद्रजींवर राग आहे असं म्हणत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा आग्रह
मी स्वतःहून भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती मला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी भाजपात येण्याचा आग्रह केला असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. याशिवाय दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपल्या गळ्यात भाजपाचा मफलर घालत ‘आपका प्रवेश जल्दी ही हो जायेगा’ असं सांगितलं असल्याचंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले
देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकेदिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून नाथाभाऊ तुमची राज्यपाल पदासाठी शिफारस करतो असं म्हटलं होतं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीची शपथ देखील घेतली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांना केला आहे.