ठाणे: एक मोठी बातमी समोर येत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.
अटक केलेल्या दोघांवर कलम ७२/ २०२४, कलम ३५४ ड, ५०९, ३४ या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.