DELHI ASSEMBLY ELECTIONS| दिल्ली विधानसभेसाठी आतापर्यंत किती टक्के झालं मतदान

399 0

दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी आज मतदान पार पडत असून आम आदमी पक्षासह भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस साठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत 19.95% इतकं मतदान झालं आहे.

दिल्ली विधानसभेसाठी आम आदमी पक्ष 70 जागांवर भारतीय जनता पार्टी 68 जागांवर काँग्रेस सत्तर जागांवर निवडणूक लढत आहे.

दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा असून बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी बजावला मतदानाचा हक्क

देशाची राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला असून दिल्लीतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयात राष्ट्रपतींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचा आवाहन राजीव कुमार यांनी यावेळी केला आहे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी बजावला मतदानाचा हक्क 

दिल्ली विधानसभेसाठी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाले असून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे

Share This News
error: Content is protected !!