दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून 70 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणूकीत आपसह भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत 08.10 इतकं मतदान झालं असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार १३,७६६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बजावला मतदानाचा हक्क
दिल्ली विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मतदानाचा हक्क बजावला असून दिल्लीतील राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयात जात द्रौपदी मूर्मु यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे