राज्यात महायुतीचं सरकार येऊन दोन महिने झाले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंबीय हे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत आणि यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर राहायला न जाण्यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असतानाच आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी काही कामं सुरू होती. यासोबतच मुलगी दिविजा हीची दहावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं तिची परीक्षा झाल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
काळी जादू आणि टोपलीभर लिंबू, मिरच्या; ‘वर्षा’ बंगल्यावरून अंधश्रद्धेचं राजकारण ?
http://youtube.com/post/UgkxKqm4_6p4PSwyM-xO7x6TEcbXxZxKQc3x?si=FwK011JdTC_zsrWg