Ujjwal Nikam

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

519 0

मुंबई : लोकसभेच्या पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुंबईतील तीन उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. आज शिवसेनेचे रविंद्र वायकर, यामिनी जाधव अर्ज भरणार आहेत तर, भाजपकडून उज्ज्वल निकम अर्ज भरणार आहेत. हा अर्ज भरण्यापूर्वी उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. निकम लढत असलेल्या जवळपास 29 केसेसमधून त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकारकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. आज उज्वल निकम आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी उद्या करण्यात येणार आहे.

भाजपने मुंबई उत्तर मध्य मधून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता भाजपने कट केला आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम असा सामना पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News
error: Content is protected !!