मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेचा उमेदवार ठरला; राज ठाकरे ‘या’ विश्वासू चेहऱ्याला उमेदवारी देण्याची शक्यता

358 0

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाले असून विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 220 ते 225 जागा लढण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणाही केली आहे. नुकतीच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा आढावा बैठकही पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसेकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी करण्यात येत असून मनसेनं सात उमेदवारही घोषित केले आहेत बाळा नांदगावकर यांना शिवडी मतदारसंघातून, दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून, संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. यासोबतच बंडू कुटे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून तर चंद्रपूर विधानसभेतून मनदीप रोडे,
राजुरा विधानसभेतून सचिन भोयर आणि
वणी विधानसभेतून राजू उंबरकर हे मनसेचे उमेदवार असणार आहेत. याशिवाय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 2009 पासून एकनाथ शिंदे हे या कोपरी पाच-पाखाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंसमोर महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबरच मनसेच्या उमेदवाराचं आव्हान असण्याची शक्यता आहे.

2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कुणी निवडणुका लढवल्या आणि त्यांचा मताधिक्य किती होतं?

2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे विरुद्ध काँग्रेसकडून मनोज शिंदे विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन गावंड अशी प्रमुख लढत झाली होती.

या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना 73,502 इतकी मतं मिळाली होती

काँग्रेसच्या मनोज शिंदे यांना 40,726 इतकी मतं मिळाली होती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजन गावंड यांना 35, 914 इतकी मतं मिळाली होती

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी तुटल्यानंतर सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते या निवडणुकीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे भाजपकडून संदीप लेले काँग्रेसकडून मोहन गोस्वामी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सेजल कदम निवडणुकीच्या रिंगणात होत्या

या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे 1 लाख 420 इतकी मतं मिळवत विजयी झाले होते

भाजपाच्या संदीप लेले यांना 48,447 इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या मोहन गोस्वामी यांना 17,873 इतकी मतं मिळाली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेजल कदम यांना अवघी 8,578 मत मिळाली होती.

2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे काँग्रेसकडून संजय घाडीगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती.

या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना तब्बल एक लाख 13 हजार 497 इतकी मतं मिळाली होती

तर काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांना अवघी 24,197 इतकी मतं मिळाली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांना 21,513 इतकी मतं मिळाली होती.

दरम्यान 2024 च्या निवडणुकीत मनसे कडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी मिळते का? आणि महा विकास आघाडी कडून कोपरी पाच-पाखाडी मतदारसंघातून कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

Share This News

Related Post

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा

Posted by - November 5, 2022 0
पुणे : शुभमंगल सावधान… चे मंगलाष्टकांचे सूर… राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या महिला अशा…

मोठी बातमी! बहुचर्चित लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Posted by - August 8, 2022 0
पुणे: पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली होती. या निर्णयाविरोधात याचिका करते नानासाहेब…
Congress

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Posted by - February 15, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसकडून आज राज्यसभेच्या (Congress Rajyasabha) उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांना संधी देण्यात आली…

#PUNE : वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने असे अडकवले जाळ्यात; पहा थरारक व्हिडिओ

Posted by - March 20, 2023 0
पुणे : पुण्यातील भर वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने अथक प्रयत्नानंतर जाळ्यात अडकवला आहे. शहरातील वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *