बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा बदलापूर पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला आहे या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. अक्षय शिंदे चा एन्काऊंटर करणारे पोलीस अधिकारी कोण आहेत आणि त्यांचं एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याशी काय खास कनेक्शन आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून..
बदलापूर मधील आदर्श विद्या मंदिरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे च्या पहिल्या बायकोने केलेल्या तक्रारीनुसार अक्षयचा ताबा घेण्यासाठी पोलीस पथक तळोजा कारागृहात पोहोचलं होतं आरोपी अक्षय शिंदे ला घेऊन पोलीस पथक ठाण्याच्या दिशेने जात असताना अक्षय पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेत तीन राऊंड फायर केले. यातील दोन फायर हवेत झाडले तर एक गोळी ही पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला लागले त्यानंतर स्वसंरक्षणासाठी मोरेंच्या सोबत असणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला.संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधी पथकात काम केलेले आहे. या पथकाचे नेतृत्व प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केले होते. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता.संजय शिंदे यांनीही मुंबई पोलीस दलात काम केलेले आहे. सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता.