44 उमेदवारांची यादी काढली आणि दोन तासातच परत घेतली; जम्मू-काश्मीर निवडणुकीवरून भाजपात काय घडतंय?

221 0

श्रीनगर: कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असून या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षासह पीडीपी बरोबरच प्रमुख राजकीय पक्ष हे जम्मू काश्मीर विधानसभेच्या प्रचाराला देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच आज भाजपाकडून 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती मात्र अवघ्या दोन तासातच ही यादी मागे घेण्यात आली आहे.

भाजपने सकाळी 10 वाजता 44 नावांची यादी जाहीर केली. 12 वाजण्याच्या सुमारास पक्षाने आपली यादी सोशल मीडिया हँडलवरून हटवली.

यानंतर पहिल्या यादीत 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागतील

पक्षांतर्गत संघर्षामुळे ही 44 उमेदवारांची यादी मागे घेण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले असून अवघ्या दोन तासातच भाजपाकडून 44 ऐवजी 15 उमेदवारांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाच्या 2014 पासून आतापर्यंत यादी जाहीर करून ती मागे घेण्याची भाजपाची पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Share This News
error: Content is protected !!