विधानसभा निवडणुकीपूर्वीच पुण्यात महायुतीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?

172 0

 

आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय नेमकं काय आहे प्रकरण पाहूया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विविध ३०६.४१ कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वडगाव शहराचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी एक फोटो पोस्ट केला.

या फोटोवर केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व राष्ट्रवादीचा पक्षाचे चिन्ह असणाऱ्या घड्याळाचा फोटो असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महायुती धर्म केवळ भाजपा आणि शिवसेनेनेच पाळायचा का असा सवाल मुळीक यांनी उपस्थित केला आहे..

दरम्यान जगदीश मुळीक यांच्या नाराजीवर विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप पर्यंत दिली नाही त्यामुळे सुनील टिंगरे यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

Share This News
error: Content is protected !!