राजू शेट्टीं ची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीमध्ये राहणार की बाहेर पडणार याचा निर्णय आज मंगळवारी होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मंगळवारी राज्य कार्यकारणी बैठक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारीच शेट्टी यांची नाराजी दूर करू, अशी ग्वाही दिली होती. तरीही ‘स्वाभिमानी’ने सत्ता सोडण्याची मानसिकता दर्शविली आहे. कोल्हापुरात मंगळवारी (ता. ५) होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शेट्टी यासंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत.