पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील काम तातडीनं सुरू करा – गिरीश बापट

345 0

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसराचे झपाट्याने होणारे शहरीकरण, तसेच रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांतून पुण्यात होणाऱ्या स्थलांतराचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर  होत आहे.

शहरातील वाहतुकीची  स्थिती चिंताजनक होत असल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किलोमीटर विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, असा मुद्दा भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट  यांनी लोकसभेत मांडला.

केंद्र सरकारचे महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेच्या खासदारांना मिळालेले नियम ३७७ हे संसदीय आयुध आहे. या अंतर्गत खासदार बापट यांनी हा मुद्दा मांडला. महाराष्ट्र मेट्रोने फेज २ साठी सर्वेक्षण आणि नियोजन सुरू केले आहे, असे निदर्शनास आणून दिले. सध्याच्या ३३.१ किमी मेट्रो मार्गांचे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किमी लांबीचे मार्गाचा विस्तार करण्यासाठी अहवाल (डीपीआर) तातडीने करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

 

दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणात वनाज ते चांदणी चौक (१.५ किमी), रामवाडी ते वाघोली (१२ किमी), हडपसर ते खराडी (५ कि.मी.), स्वारगेट ते हडपसर (७ किमी), खडकवासला ते स्वारगेट (१३ किमी) आणि एसएनडीटी ते वारजे (८ किमी) तसेच पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ किलोमीटरचा सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखतील, संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक वक्तव्य

Posted by - May 24, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर…
pune police

पुणे शहरातील 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - January 20, 2023 0
पुणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन सहायक…

5 राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल ; बहुमतासाठी किती जागांची आहे आवश्यकता ? वाचा सविस्तर

Posted by - March 10, 2022 0
देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून…

मुंब्रामधील एम.जे कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, आगीत 4 ते 5 गोदामे जळून खाक

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- मुंब्रामधील एम.जे कंपाऊंड मधील भीषण आगीमध्ये गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. या…

जलसमाधी आंदोलन होणार? रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक झाली असून, जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन रवाना झाले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *