ajit pawar and supriya sule

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

508 0

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी निवडणुकीत शेवटच्या तीन दिवसात धनशक्तीचा वापर होईल असं म्हटलं होतं. सुनंदा पवार यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना एक मोठे विधान केले.

काय म्हणाले अजित पवार?
सुनंदा पवार यांनी निवडणुकीत धनशक्तीचा वापर होईल असा आरोप केला होता. या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी यावर काही बोलायचं नसल्याचं म्हटलं. पण त्याचवेळी आपण कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यायला बांधील नसल्याचं सांगितलं. आमच्या योग्यतेच्या माणसाने प्रश्न विचारला तर मी त्याला उत्तर देईल. मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हटलं होतं.

सुप्रिया सुळेंनी दिले ‘हे’ उत्तर
सुप्रिया सुळे यांनी सुनंदा पवार यांच्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की,“मला त्याबद्दल काही माहिती नाही. मला विश्वास बसत नाही तो असा बोलू शकेल. मी चेक करून बोलते.” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!