3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नऊ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेले धैर्यशील पाटील आहेत कोण? पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून..
मागील वर्षीच शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत धैर्यशील पाटील भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले होते. भाजपकडून रायगड लोकसभा निवडणूक लढण्यासाठी धैरशील पाटील इच्छुक होते मात्र महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेली आणि सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर आता भाजपा कडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे
नेमके कोण आहेत धैर्यशील पाटील…
-
शेकाप नेते, माजी राज्यमंत्री मोहन पाटील यांचे पुत्र आहेत धैर्यशील पाटील
-
धैर्यशील पाटील भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष आहेत
-
2009 आणि 2014 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून पेण मतदार संघातून आमदार 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या रवीशेठ पाटील यांनी धैर्यशील पाटील यांचा पराभव केला
-
2023 मध्ये शेकापला सोडचिठ्ठी देत धैर्यशील पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय