3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नेमके कोण आहेत नितीन पाटील पाहूया टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट…
लोकसभा निवडणुकी वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई महाबळेश्वर आणि खंडाळा भागातून महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य द्या नितीन काका पाटलांना मी खासदार करतो असा शब्द जाहीर सभेमध्ये दिला होता. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून पियुष गोयल आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या या दोन पैकी एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपाकडून देण्यात आली आणि यात जागेवर नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
कोण आहेत नितीन पाटील
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र
वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटलांचे बंधू आहेत नितीन पाटील
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून नितीन पाटलांकडे जबाबदारी
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वासू चेहरा अशी ओळख