आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 225 ते 250 जागा लढवण्याची तयारी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सुरू आहे या नवनिर्माण यात्रेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या उमेदवारांची घोषणा करताना पाहायला मिळत आहेत.
सुरुवातीला पंढरपूर मध्ये शिवडीतून बाळा नांदगावकर पंढरपूर मंगळवेढ्यातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्यानंतर काल लातूर ग्रामीण मधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी मिळाली.
आज राज ठाकरेंची नवनिर्माण यात्रा हिंगोलीत होती यावेळी हिंगोलीतून प्रमोद उर्फ बंडू कुटे यांची उमेदवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
कोण आहेत प्रमोद कुटे?
प्रमोद कुटे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष असून हिंगोली नगरपरिषदेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले हिंगोली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे तानाजी मुटकुळे हे आमदार असून आता कुटे यांचा सामना भाजपसोबत होताना पाहायला मिळणार आहे.