हडपसर येथे खाजगी बसला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

12 0

पुणे – आज सकाळी ०९•०२ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात हडपसर येथे कदम बाग वस्तीलगत (सोलापूर महामार्ग) येथे एका बसला आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर व पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका खाजगी बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे. त्याचवेळी जवानांनी प्रथम बसमध्ये कोणी आहे का याची खाञी करत आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे वीस मिनिटात आग पुर्ण विझवत धोका दूर केला. या घटनेत जखमी कोणी नसून या बसमधील १४ प्रवासी व वाहनचालक सुरक्षित आहेत. बस पुर्ण जळाल्याने प्रवाशांचे सामान व डिक्कीमधील एक दुचाकी देखील जळाली आहे.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच वाहनचालक नारायण जगताप व जवान बाबा चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड व पीएमआरडीएचे वाहनचालक संदिप शेळके व जवान लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सुरज इंगवले, संकेत कुंभार यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

Chitra-Wagh-Supriya-Sule

तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटेल; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Posted by - June 8, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी वायरल झालेल्या मंचर प्रकरणातील घटनेटवरून राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत.…
Anis Sundke

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 17, 2024 0
पुणे : अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके…

भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट*

Posted by - September 11, 2023 0
पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅबोरेटरीचे उद्घाटन

Posted by - April 18, 2022 0
पुणे- दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग व युथ फॉर जॉब फाऊंडेशन यांच्या…
PMPML

PMPML : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

Posted by - July 23, 2023 0
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) आपल्या कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत थेट 36…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *