Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : 4 जूननंतर दोन्ही ठाकरे बंधू…, प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा

571 0

नाशिक : आज पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात प्रचार सभा, रॅली, रोड शो सुरू आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘उद्या एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आहे तिचे प्रमुख राज ठाकरे झाले तर आश्चर्य व्यक्त करू नये’ असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. ‘उद्या एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आहे तिचे प्रमुख राज ठाकरे झाले तर आश्चर्य व्यक्त करू नये. नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी दोन भावंडांमध्ये रेस लावलेली आहे. लॉयल्टीची रेस लावलेली आहे. मोदी म्हणाले होते की, गरज पडली तर उद्धवजींना सर्वतोपरी मदत करेल आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना मजबूर करणे, प्रचाराला बोलावणे असे प्रकार सुरू आहे. दोन भावंडांमध्ये अधिक लॉयल्टी कोणाकडे यामध्ये चुरस लावलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील अशी परिस्थिती दिसत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalgaon News : धक्कादायक ! परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा

Avinash Bhosale : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग

Pune News : पुणे हादरलं ! दुसरीकडे शारीरिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Kishori Pednekar

Kishori Pednekar : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - August 5, 2023 0
मुंबई : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा…
Pune News

Pune News : धरणाच्या पाण्याचा अंदाज चुकला अन्; पुण्यातील बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी असणाऱ्या भाटघर धरणाच्या (Pune News) बॅकवॉटरमध्ये बुडून बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू…
Nashik Ganesh Visarjan

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; 2 जण बुडाले

Posted by - September 28, 2023 0
नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील (Nashik Ganesh Visarjan) निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याची घटना ताजी असताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *