आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नियोजन समितीची स्थापना करण्यात आली असून या नियोजन समितीची उद्या मुंबईत बैठक होणार आहे…
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पीछेहाटीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सज्ज झाली असून याच पार्श्वभूमीवर महायुतीने निवडणुकीच्या तयारीसाठी नियोजन समितीची स्थापना केली आहे.
या नियोजन समितीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे 2 असे सहा सदस्य असतील
नियोजन समितीत कुणाचा समावेश?
भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रसाद लाड हे या नियोजन समितीचे अध्यक्ष असतील
भाजपाकडून या समितीत राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर समितीमध्ये असतील
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत आणि अशिष कुलकर्णी यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत तटकरे आणि संजय खोडगे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय