बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन आता आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसले आहेत. देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
कालच्या भीषण चकमकींमध्ये तब्बल 98 लोक मारले गेले. त्यानंतर आता बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकर-उझ-झमान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाल्यापासून मृतांची संख्या 300 वर पोहोचली आहे.
दरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देशाती सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.